बारामती, दि. ५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साठ आंबा फळरोपाचे वृक्षारोपण प्रशासकिय भवनातील परिसरात आज करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, स्वाती गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनपाल गणेश सरोदे, जहिर शेख, वनरक्षक दयानंद अवघडे याचबरोबर इतर अधिकारी कर्मचारी, नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संरक्षण संर्वधन बाबत प्रतिज्ञा करण्यात आली.

या कार्यक्रमात वृक्षसंवर्धन, प्लास्टीक कचरा निर्मुलन, इंधन बचतीबाबत नागरिकाना सामाजिक वनीकरण विभागामार्फत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *