प्रतिनिधी – ग्रामपंचायत हिंगणीगाडा येथे हेन्केल आनंद इंडिया प्रा लिमिटेड, कुरकुंभ यांच्या सीएसआर निधीतून व एस.एन.एस फाउंडेशन यांच्या सहकार्यातून बिरोबा तलाव येथे संधारण भितींचे बांधकाम व पिराचं तलावाचे पुनर्भरण ही विकास कामे पूर्ण झाली आहेत. या विकास कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या विकास कामाचे उद्घाटन हेन्केल कंपनीचे भूपेश सिंग व योगेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच अभिजीत खराडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या कामाबद्दल कंपनीचे व संस्थेचे आभार मानले. एस एन एस फाउंडेशनचे योगेश गाढवे व कृषी विभागाचे राहुल लोणकर यांनी उपस्थित बचत गटातील महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने विषयी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास वैशाली माने, सर्व बचत गटातील अध्यक्ष ,सचिव व सदस्य महिला, शिवाजी खराडे ,विलास शिंदे ,सुभाष खराडे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed