प्रतिनिधी – तालुका कृषी अधिकारी दौंड व मंडल कृषी अधिकारी पाटस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणी गाडा तालुका दौंड या ठिकाणी महिला शेतकरी बचत गट यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी राहुल लोणकर कृषी सहाय्यक यांनी सोयाबीन, बाजरी, मका ,बीज प्रक्रिया, तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणी विषयी मार्गदर्शन, हुमणी किड नियंत्रण प्रकाश सापळा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) याविषयी महिलांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच या योजने अंतर्गत येणारे प्रक्रिया उद्योग याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले व इच्छुक महिलांची नावे घेण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी महिला बचत गटाच्या वैशाली माने तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्विनी गायकवाड, पोलीस पाटील प्राजक्ता गायकवाड, महिला बचत गटाच्या अध्यक्षा उपस्थित होत्या.