विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते लवकर होणार उद्घाटन..

बारामती : (दि:२८) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. भव्य सुसज्ज सर्व सोयीयुक्त समाज मंदिर उभारण्यात आले आहे. लवकरच या समाज मंदिराचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

शहरातील अनंत आशा नगर सर्वे नंबर २२० येथे उभारण्यात आलेल्या समाज मंदिरास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिर असे नाव देण्यात आले आहे. अनेक वर्षापासून होलार समाजाकडून समाज मंदिर उभारण्याची मागणी होत होती. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होलार समाजासाठी प्रशस्त सर्व सोयीन युक्त समाज मंदिर उभारण्यात आले आहे. समाज मंदिराचे समाजाचे स्वप्न लवकरात साकार होणार आहे.

येत्या आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची वेळ घेऊन समाज मंदिराच्या उद्घाटनाची तारीख घेऊन त्यांच्या हस्ते समाज मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरज देवकाते यांनी माध्यमांना दिली.

तसेच या उद्घाटन प्रसंगी होलार समाजातील राष्ट्रीय नेत्यांसह अनेक पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे देवकाते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed