बारामती: बारामती येथील प्रसिद्ध व्यापारी, सचिन महाडिक यांनी काल झालेल्या वादळी पावसात, प्रसंगावधान दाखवून करड्या बगळ्याचा जीव वाचविला. वादळी पावसात निलगिरीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या त्यात वादळ पावसाचा मारा बसून २ करडेबगळेजखमी होऊन खाली पडले. सचिन महाडिक हेजुना मोरगाव, जगताप मळा येथे राहतात. त्यांच्या राहत्या घराबाहेर, अंगणात २ बगळे निलगिरीच्या झाडावरून खाली पडले, त्यावेळी त्यांनी तत्परता दाखवून, त्या बगळ्याला घरामध्ये आणून त्याला कोरड्या कपड्यात ठेऊन, त्याचा जीव वाचवा म्हणून काळजी घेतली. मार लागल्यामुळे पक्षी घाबरला होता. त्याला पाणी पाजून, हेअर ड्रायरच्या सहाय्यानेकोमट वातावरण तयार करून एक प्रकारेधीर देण्याचेकाम श्री. सचिन महाडिक यांनी केले. त्यानंतर सचिन महाडिक यांनी बारामती परिसरात सर्प मित्र म्हणून कार्यरत असणारे मल्लिकार्जुन हिरेमठ यांना संपर्क केला. मल्लिकार्जुन यांनी त्वरित श्रेयस कांबळे व त्यांचे सहकारी यांच्या सहाय्याने पुणे येथील रेस्कू चॅरिटेबल ट्रस्ट या एन.जी.ओ. कडे सदर पक्षाला उपचारासाठी पाठविले. काल झालेल्या वादळी पावसात निलगिरीच्या झाडावरून पडल्यामुळे त्यातल्या एका बगळ्याची बरगडी मोडली आहे, त्याला कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे ३ वाजता पुण्याला हलविले, वेळेत उपचार मिळाल्यामुळेत्याचा जीव वाचेल अशी माहिती श्रेयस कांबळे यांनी दिली. दरम्यान, सचिन महाडिक, मल्लिकार्जुन हिरेमठ, श्रेयस कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.