बारामती शहर पोलिस स्टेशन आणि युवकांच्या मदतीने.. हरवलेला मुकबधिर मुलाची आणि वडिलांची झाली भेट

बारामती : काल दिनांक 25-05-2023 रोजी देशमुख चौक बारामती येथे एक लहान मुलगा आढळून आला.त्याला त्याठिकाणी थांबलेले नागरिक प्रश्न विचारात होते.परंतु त्याने कोणताही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हता.एका व्यक्तीने त्याला हातावर नाव लिहायला सांगितल्यावर त्याला लिहिता येत नव्हते.बोलत नसल्यामुळे सगळ्यांना वाटले की याला मराठी भाषा समजत नसेल बाहेर राज्यातील असेल असे उपस्थित नागरिक म्हणत होते.त्यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे , महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, बारामती शहराध्यक्ष निखिल भाई खरात, बारामती शहर संघटक समीर खान यांनी लोकांना विचारणा केल्यावर समजले की हा मुलगा हरवलेला आहे. त्याला मदतीची गरज आहे. त्याला बोलता येतं नसल्यामुळे नाव व पत्ता सांगता येत नव्हते. त्यावेळी सदर मुलाला बारामती शहर पोलिस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर बारामती शहर पोलिस स्टेशनचे पी. एस.आय.निंबाळकर व ठाणे अंमलदार शंकर काळे यांनी सहकार्य केले व मुलाच्या पालकांची माहिती मिळवण्यासाठी मदत केली.तसेच निखिल भाई खरात यांनी बारामती मधील मुकबधीर विद्यालयातील संतोष काळे सरांशी संपर्क केला. त्यावेळी मुकबधीर शाळेचा विद्यार्थी आहे हे समजले आणि मुलाचे नाव मयुर मोरे आहे.आणि हा बारामती तालुक्यातील उंडवडी गावातील रहिवासी आहे. हे समजले त्याच्या वडीलाचा मोबाईल नंबर घेऊन बळीराम मोरे यांना बारामती शहर पोलिस स्टेशनला बोलावून घेतले.आणि सदर मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.मुलाच्या वडिलांनी सर्वाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *