बारामती :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चोंडी. तालुका जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता. “अहिल्या उत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विशेष अतिथी म्हणून श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (तृतीय), आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे राहणार आहेत सालाबादप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राज्यभरातून मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त बारामती तालुक्यातून हजारो कार्यकर्ते चौंडीतील कार्यक्रमास मोठ्या संख्येने जाणार आहेत असे यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, यांनी ही माहिती दिली आहे 31 मे रोजी सकाळी नऊ वाजता अहिल्यादेवी चौक बारामती येथून कार्यकर्ते जाणार असल्याचे त्यावेळी सोलनकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *