प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने दौंड तालुक्यात तालुका कृषि अधिकारी राहुल माने, मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीक उत्पादन तंत्रज्ञान प्रचार प्रसार व कृषि विभागाच्या योजनांची प्रसिध्दी विशेष पंधरवडा मोहीम राबवुन करण्यात येत आहे.या मोहीमेचे आयोजन दि २० मे ते ३० जुन पर्यंत करण्यात आले आहे.त्यानुसार पाटस मंडळ कार्यक्षेत्रात वरवंड ते स्वामीचिंचोली या गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर कृषि सहाय्यक यांच्या मार्फत शेतकरी मेळावा, बैठका, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक यांच्या माध्यमातून बाजरी, मका, सोयाबीन यांची बीजप्रक्रिया, घरगुती बियाणे उगवणक्षमता तपासणी, हुमणी अळीचे नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळा,माती परीक्षण,महा डिबीटी पोर्टल वरील कृषि विभागाच्या कृषि यांञीकीरण, सुक्ष्म सिंचन, कांदाचाळ, शेततळे योजना, तसेच इतर मुख्य योजना जसे की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर फळबाग लागवड योजना, पीक विमा योजना,पीएम किसान योजना, याबाबत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवुन या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.ही विशेष पंधरवडा मोहीम राबविण्यासाठी कृषि पर्यवेक्षक पोपट चिपाडे, अतुल होले, कृषि सहाय्यक अंगद शिंदे, अझरुद्दीन सय्यद, शंकर कांबळे, प्रकाश लोणकर, राहुल लोणकर, संदीप सरक, मोनिका दिवेकर, रेखा पिसाळ, हे विशेष प्रयत्न करीत आहे.