प्रतिनिधी – कृषि विभागाच्या खरीप हंगाम बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीमा मध्ये सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन बांदल मॅडम तालुका कृषि अधिकारी बारामती यांनी केले आहे. सविस्तर माहिती अशी की, शिर्सुफळ दिनांक २४ मे २०२३ रोजी कृषि विभागामार्फत शिर्सुफळ येथे खरीप हंगाम मोहीम अंतर्गत बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन केले होते. यावेळी शेतकरयांनी घरच्या घरी बियाणे उगवणक्षमता चाचणी घेऊन त्यानुसार बियाणे पेरणीसाठी वापरण्याची पद्धत उत्कृष्ट असल्याचे व बियाणे वरील खर्च कमी करणे तसेच पीक उत्पादन खर्च कमी करून उत्त्पन्न वाढविणे प्रमुख उद्देश आहे. तसेच बीजप्रक्रिया केल्याने पिकाच्या उत्पादन मध्ये १० ते १५ वाढ होते शेतकरयांनी खरीप हंगामा २० मे ते ५ जून २०२३ पर्यंतच्या मोहिम मध्ये सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असलचे व कृषि विभागच्या विविध योजनांचा लाभ घेणेबाबत यावेळी बांदल मॅडम तालुका कृषी अधिकारी बारामती यांनी आव्हान केले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी उंडवडी यांनी अर्ज एक योजना अनेक महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन प्रणाली सांगितले यावेळी कृषि पर्यवेक्षक घोळवे यांनी शेतकरी अपघात विमा योजना बाबत माहिती दिली. यावेळी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले सोयाबीन,कांदा असे इतर पिकांचे पेरणी पूर्वी बियाणे उगवण क्षमता चाचणी घेता येत असल्याचे व शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक द्वारे रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक द्वारे मंडल कृषी अधिकारी यमगर व श्रीमती प्रतीक्षा दराडे कृषि सहाय्यक शिर्सुफळ यांनी यावेळी सांगीतले.