बारामतीचे सुपुत्र इम्रान तांबोळी प्रमुख भुमिकेत.. शंकर महादेवन, जावेद अली यांच्या आवाजात झळकणार गेट टू गेदर सिनेमामध्ये…
प्रतिनिधी : शालेय जीवनातील मुलगा व मुलगी यांच्यातील पहिल्या प्रेमाबद्दल ची कथा असणारा सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तसेच NSD चे वर्कशॉप केलेला आणि एकांकिकेमध्ये प्रमुख भूमिका केलेला , बारामतीचा अभिनेता इम्रान तांबोळी गेट टू गेदर सिनेमा मधे प्रमुख भूमिका करत आहे, आणि त्याची भूमिका वयाच्या २५ नंतर ची देवमाणूस या सिरियल मधील अभिनेता एकनाथ गीते तसेच साऊथ सिनेमामधील अभिनेत्री त्रिशा कमलाकर , श्रेया पासलकर, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी,अतुल नवगीरे , प्रीतम, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
काही दिवसांपूर्वीच गेट टुगेदर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला होता. तर आता २ गाणी लाँच करण्यात आली आहेत . शालेय जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत की नाही. हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल, या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न “गेट टुगेदर” या चित्रपटात करण्यात आला आहे.
यातील आभास की भास की, तुझा हा श्वास गं’ असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली, प्रियांका बर्वे तसेच वाटा का दूर दूर जाती गाण , शंकर महादेवन यांच्या आवाजासह , इम्रान तांबोळी यांनी अभिनय केला आहे. या दिग्गज गायकांचा आवाज या गाण्याला लाभला असून, उत्तम पद्धतीनं हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.त्याच बरोबर आर्य आंबेकर यांच्या आवाजाबरोबर एकनाथ गीते त्रिशा कमलाकर आहेत , रिलीज झालेली गाणी लोकांच्या पसंती पडलेली असुन या फिल्म ची उत्सुकता युवक वर्गात वाढली असुन येत्या २६ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे.