बारामती : आई शेतात काम करीत असताना लेकीने आई मी पोलीस झाले अशी आनंदाची बातमी देताच आईच्या डोळ्यात आश्रूच्या धारा लागल्या. बारामती मोरगाव (आंबी ) येथील लिलाबाई संपत कुंभार यांची लेक गौरी संपत कुंभार हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. गौरी ला मिळालेल्या या यशामुळे गौरी च्या घरी आनंदाचे वातावरण आहे. गौरी ची जिद्ध व चिकाटी यामुळेच तिने हे यश मिळवले असल्याचे तिची आई लिलाबाई यांनी सांगितले. एकीकडे शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना बारामती तालुक्यातील शेतकऱ्याच्या लेकीने पोलिस भरतीमध्ये जाण्याचा घेतलेला ध्यास. आज सफल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जिद्द व चिकाटी मुळेच होऊ शकले.

गौरी ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिची आई लिलाबाई व वडील संपत कुंभार दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. आई वडील अल्पशिक्षित असताना देखील गौरी ला पोलीस होण्यासाठी शारदा महिला पोलीस अकॅडमी शारदा नगर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले व त्याचे गोग्य फळ तिने आपल्या आई वडिलांना दिले. आई वडील व माझा छोटा भाऊ यांच्या प्रोत्साहनाने माझी पोलीस होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. भविष्यात मी नक्कीच इतर मुलींना पोलीस दलात येण्यासाठी प्रोत्साहन मार्गदर्शन करेल असे गौरी संपत कुंभार हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed