प्रतिनिधी – सध्या महिलांना एसटी बस भाड्यामध्ये 50 टक्के आरक्षण झाल्यामुळे बहुसंख्य महिला ह्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहेत. त्यामुळे महिलांची गर्दी दिवसेंदिवस बस मध्ये वाढलेली आहे ह्या गर्दीचा फायदा घेऊन काही संशयित महिला या महिलांच्या दागिन्यावर हात साफ करत असतात, विशेष करून बसमध्ये चढताना एखाद्या महिलेला संशयित महिला ह्या घेरतात धक्काबुक्की मध्ये हळूचपणे गळ्यातील मंगळसूत्र किंवा चैन चोरली जाते आणि ते इतर महिलांना कळतही नाही. अशाच पद्धतीने दक्ष वाहकाच्या मदतीने व प्रवाशांच्या मदतीने सोना घायाळ काळे वय 38 वर्ष राहणार चिकुर्डे तालुका वाळवा व सुनीता तात्या शिंदे वय 45 वर्षे राहणार मडव खडक निरगुडी तालुका फलटण या दोन महिला संशयतरी त्या महिला प्रवाशांचे दागिने चोरत असताना किंवा चोरण्याचा प्रयत्न करत असताना मिळून आल्या व या दोन महिलांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये साधारणपणे दीड तोळ्याचे मंगळसूत्र मिळून आलेले आहे. सदरचे मंगळसूत्र कोणाचे आहे याबाबत त्यांना माहिती देता आलेली नाही. सदर महिलांच्यावर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली आहे. सदर महिलांनी आणखी कोणाचे दागिने चोरले असल्यास त्याबाबत बारामती शहर पोलिसांशी उद्या संपर्क करावा. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस फौजदार आबा जगदाळे, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया कांबळे, पोलीस कर्मचारी मोना माकर, ऋतुजा गवळी, पोलीस हवालदार संध्याराणी कांबळे यांनी ही कारवाई केली आहे.