प्रतिनिधी – चंदनाला आयुर्वेदात विशेष महत्व आहे.चंदन हे अतिशय सुगंधी , शीतल म्हणजे थंड असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या श्रीमंत आबा गणपती बाप्पा मूर्तीस शीतलता वाटावी यासाठी दरवर्षी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो तदनंतर केलेल्या महाप्रसाद सोबत प्रसाद म्हणून लिंबू सरबत चा रस ही श्री ना दाखवला जाते.
मार्च ते मे महिन्यात माणसाच्या शरीराची उष्णता कमी व्हावी म्हणुन माणूस स्वतः साठी ज्या प्रमाणे निरनिराळे प्रयोग करतो त्या प्रमाणे हिंदू धर्मात गुडी पाडवा ते मृग मृगनक्षत्र निघे पर्यंत आपल्या देवी देवतांना उष्णतेचा दाह कमी जाणवावा,मूर्तीस थंडावा जाणवावा यासाठी एक श्रद्धेचा भाग म्हणुन चंदन उटीचा लेपन करण्यात येते.बारामती करांचे श्रद्धा स्थान असलेल्या श्रीमंत आबा गणपती च्या मूर्तीस चंदन उटी चा लेपन करण्यात आले. चंदन उटी लेपा मध्ये श्रीची मूर्तीचे रूप हे सुवर्णअलांकरा पेक्षाही सुंदर दिसत होते. मंदिरास फुलांची सजावट देखील करण्यात आली होती. सायंकाळी 6.00 वा.भजन कीर्तन होऊन 7.00 वा.श्रीमंत आबा गणपती बाप्पा ची आरती सुरेश लाखे,सागर अवघडे, गुणवंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.आरती झाल्या नंतर श्रीच्या मूर्तीस चंदन उटीचा लेप चडवण्यात आला.तदनंतर त्या ठिकाणी गणेश भक्तांसाठी साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनेक गणेश भक्तांनी महाप्रसादाचा याचा लाभ घेतला.कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुनील लडकत, रमेश पंजाबी,निखिल लोंढे, अविनाश भापकर, प्रकाश पळसे,श्रीकांत जाधव,संजय गुळवे,मोहन पंजाबी, दिनकर जाधव, कपिल सावंत,रोहित पाटील, अतुल भागवत, स्वप्नील भागवत,अमर लोहोकरे,प्रमोद बुलबुले,लल्लू ढवळे,चेतन जाधव,निलेश गायकवाड,प्रकाश फडतरे,शांताराम बागल, सौरभ राठोड,अरुणदादा नलवडे,प्रेमराज गायकवाड, तेजस गायकवाड अनिरुद्ध गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले