कृषि विभागामार्फत गोजूबावी येथे महिला शेतीशाळेचे आयोजन ; महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी – कृषि विभागामार्फत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंघाने मौजे गोजूबावी ता. बारामती या ठिकाणी महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खरीपाची पेरणी करण्यापूर्वी मका, सोयाबीन, कांदा यासारख्या पिकांच्या बियानांची उगवणक्षमता शेतकऱ्यांनी घरीच तपासून बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले. सदर शेतीशाळेमध्ये मका, सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी व मका, बाजरी बियाणे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिके कृषि सहाय्यक सौ. पी. बी. ननावरे यांनी करून दाखविली. उगवण क्षमता चाचणी करण्याचा मुख्य उद्देश हा बियाणावरील तसेच पिक उत्पादनावरील खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. तसेच पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक नंतर कीटकनाशक व सर्वात शेवटी जैविक बिजप्रक्रिया करावी. बिजप्रक्रिया केल्याने बियाणांद्वारे होणाऱ्या रो्गांचे नियंत्रण करता येते व बियाणे उगवणक्षमताही वाढते असे सौ.ननावरे यांनी सांगितले. तसेच यावेळी कृषि विभागाच्या विविध योजना, महाडिबीटी, मृदा परीक्षण, हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, भरड धान्याचे आहारातील महत्व PMFME योजना इ. विषयी महिलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास महिला शेतकरी यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला व या उपक्रमाबद्दल कृषि विभागाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *