प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रा.विवेक बळे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय ‘A Study of Impact of Online Marketing on Electronic Goods with Special Reference to Western Maharashtra’ असे होते. सोलापूर येथील सोलापूर सोशल असोसिएशनचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर या ठिकाणी संशोधनाचे काम केले. या संशोधनासाठी सोलापूर सोशल असोसिएशन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एम.ए.दलाल यांनी शोधनिर्देशक म्हणून त्यांना मार्गदर्शन केले. प्रा.विवेक बळे हे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विभागात गेल्या ८ वर्षापासून अध्यापन करीत असून महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. आतापर्यंत चार कॅडेट्स, दिल्ली येथील नामांकित आर डी सी कॅम्प त्यांनी पूर्ण केला असून सात छात्र भारतीय सैन्य दलामध्ये ते सहभागी झाले आहेत. नागपूर येथे एनसीसी प्रशिक्षण दरम्यान राष्ट्रीय छात्र सेनेतील सर्वोच्च बहुमान डीजी बॅटन या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध परिषदांमध्ये सहभागी होवून संशोधन प्रबंध सादर केलेले आहेत.
प्रा.डॉ.विवेक बळे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *