स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई ; दोन गावठी पीस्टल व दोन जिवंत काढतुसासह 3 आरोपींना घेतले ताब्यात…

प्रतिनिधी – बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या जबरी चोरी गुन्हा उघडकीस आणणे बाबत अंकित गोयल सो,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. मा.वरिष्ठ पो.नि. श्री अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन एलसीबी चे पथक तयार करण्यात आले होते.सदरचे पथक तपासाच्या अनुषंगाने बारामती एमआयडीसी भागात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत हजर असताना.दि 13/5/23 रोजी 11/00 वा.चे सुमारास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की बारामती भवानीनगर कडे जाणारे रोडवर काटेवाडी उड्डाणपूल खाली दोन इसम उभे असून त्या दोघांच्या कमरेला पँटच्या आतील बाजूस कमरेला एक एक गावठी पिस्टल खवलेले असून सदरचे पिस्टल हे ऋषिकेश उर्फ माया सावंत राहणार जाचक वस्ती लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडून खरेदी केले आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून त्यांस ताब्यात घेतले असता त्याने त्यांचे नाव 1) आकाश उर्फ अक्षय संतोष खोमणे वय 24 वर्ष राहणार चिखली तालुका इंदापूर जिल्हा पुणे. 2) सोमनाथ ज्योतीराम खुरंगे वय 25 रा रुई पाटी हनुमान मंदिरा शेजारी तालुका बारामती जिल्हा पुणे. असे असल्याचे सांगितले. त्याचे कब्जामध्ये देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र त्यासोबत लागणारे दोन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर बाबत त्यांच्याकडे विचारपूस केले असता. सदरचे अग्नीशास्त्र व काडतुस त्यांनी इसम नामे ऋषिकेश नितीन सावंत रा. जाचक वस्ती लासूर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे. याचेकडून खरेदी केल्याचे सांगितलेने.त्यांचे विरोधात बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र नंबर 371/2023 आर्म ॲक्ट कलम 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी बारामती तालुका पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.


सदर कामगिरी मा अंकित गोयल सो,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण,मा.आनंद भोईटे अपर पोलीस अधीक्षक, पुणे ,मा. गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा.पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर , सपोनी महादेव शेलार,पो.स.ई जगदाळे पो.स.ई अमित सिदपाटील पो.स.ई अभिजीत सावंत सहा.फौज बाळासाहेब कारंडे सहा.फौज रविराज कोकरे पो.हवा.सचिन घाडगे. पो. हवा अभिजीत एकशिंगे, पो.हवा.अजित भुजबळ पो.हवा जनार्दन शेळके पो.हवा.विजय कांचन. पो.हवा.स्वप्निल आहीवळे पो.हवा राजू मोमीन, पो.हवा. मंगेश थिगळे पो.हवा.योगेश नागरगोजे,पो.नाईक बाळासाहेब खडके पो.नाईक तुषार भोईटे पो.कॉ धीरज जाधव पो.कॉ. अमोल शेडगे. चालक सहा फौज मुकुंद कदम पो.कॉ.दगडु विरकर पो.कॉ.अक्षय सुपे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *