प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीच्या आरती भगत व रिया आगवणे यांची हॉंगकाँग येथे होणा-या आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात या दोन खेळाडूंची निवड झालेली आहे. लव्हली युनिव्हर्सिटी फगवारा या ठिकाणी झालेल्या निवड चाचणी शिबिरातून अंतिम भारतीय संघ निवडण्यात आला. हा संघ हॉंगकॉंग या ठिकाणी आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी खेळणार आहे. आरती भगत व रिया आगवणे या खेळाडूंनी शालेय स्तरापासून बेसबॉल खेळात सहभाग घेऊन अनेक महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व भारतीय बेसबॉल संघटनेच्या मान्यतेने अनेक राज्य, राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पदके प्राप्त केलेली आहेत. महाराष्ट्र राज्याचे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. या खेळाडूंनी आपल्या खेळात ठेवलेले सातत्य, अथक मेहनत, जिद्द व चिकाटी या जोरावर प्राप्त केले आहे. या खेळाडूंना डॉ.गौतम जाधव व प्रा.अशोक देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव, मिलिंद शाह वाघोलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व प्राध्यापक, रजिस्ट्रार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed