पिंपळी: पिंपळी गावचे विद्यमान उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत पॅनेल प्रमुख व छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा.संचालक रमेशराव ढवाण पाटील आदींनी ग्रामपंचायत सदस्य बैठकीत सदस्या अश्विनी बनसोडे यांच्या नावाची घोषणा केली.
उपसरपंच निवड ही निवडणूक प्रक्रियेने पार पडली. उपसरपंच पदासाठी एकमेव अश्विनी सुनिल बनसोडे यांचा अर्ज आल्याने निवड सभेत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास विकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी घोषित केले. उपसरपंच निवडणूक बिनविरोध करून पिंपळी विविध विकास सोसायटीचे मा.चेअरमन अशोकराव देवकाते पाटील यांनी चांगला संदेश दिला.
निवड सभेत अभिनंदन ठराव संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी मांडला. याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करताना अश्विनी सुनिल बनसोडे यांचे महिला बचतगटासाठी असलेले योगदान व इतर सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड केल्याचे सांगितले व त्यांनी पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मावळते उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी बनसोडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
पिंपळी-लिमटेक गावचा सर्वांगीण विकास संचालक,सरपंच व सर्व सदस्य यांच्या मदतीने करू तसेच महिला व युवतींना वेगवेगळ्या योजना मिळवून देवू व त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी बनसोडे यांनी दिली.
स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले.
यावेळी पिंपळी गावचे सरपंच मंगल केसकर,उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील, छत्रपती कारखाना संचालक संतोष ढवाण पाटील,बारामती खरेदी विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे, ग्रामपंचायत मा.उपसरपंच राहुल बनकर, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात,वैभव पवार,उमेश पिसाळ ग्रामपंचायत सदस्या स्वाती ढवाण पाटील,मंगल खिलारे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे तसेच अशोकराव ढवाण पाटील,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद मोरे,सोसायटी मा.व्हा.चेअरमन अशोकराव देवकाते पाटील,मा.सरपंच रमेशराव देवकाते पाटील,संजय बनसोडे, हरिभाऊ केसकर,अविनाश निकाळजे, चेतन खोमणे,ग्रामपंचायत मा.सदस्य अशोकराव थोरात,नंदकुमार बाबर,दत्तात्रय तांबे,बाळासो बनसोडे,संतोष गायकवाड, विजय बनसोडे, अनिल बनसोडे,भानुदास बाबर,राजू गायकवाड,अक्षय थोरात,गोकुळ थोरात,निलेश गायकवाड,राहुल शिंदे,अमोल ओहळ,दिपक गायकवाड,मच्छिंद्र गायकवाड,मनोज थोरात, अनिल बनसोडे,सुदर्शन थोरात तसेच महिला सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्नेहा थोरात,ग्रामस्थ मा.सरपंच अंजना खोमणे,
ज्योत्स्ना गायकवाड,पुनम थोरात, सोनाली बनसोडे,रुपाली भोसले,दिपाली लोंढे, सुप्रिया थोरात, मानींनी थोरात, सारिका दडस, उर्मिला वाघ,कौशल्या थोरात,बेगम इनामदार,भारती यादव, प्रियांका नामदास,मेघा गायकवाड, माधुरी धोत्रे,सुरेखा भिसे,लता गायकवाड,सारिका थोरात, मनिषा गायकवाड,मयुरी गायकवाड,सुनिता गायकवाड आदिंसह बचतगटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार अशोकराव ढवाण पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *