टेक्निकलचे 18 विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती साठी पात्र

प्रतिनिधी – बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे 18 विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दृबल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS परीक्षा) शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत. त्यातील कु.खराडे सिद्धी महेंद्र, वायसे विराज शिवाजी, नेहरे प्रथमेश सुनील या 3 विद्यार्थ्यांना इ 9 वी ते 12 पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर उर्वरित 15 विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.या 15 विद्यार्थ्यांना इ 9 वी ते 12 पर्यंत 9600 रु.दरवर्षी शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणार आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सदाशिव सातव(बापूजी) यांनी केले. विद्यालयाचे प्राचार्य पोपट मोरे, उपमुख्याध्यापक कल्याण देवडे, पर्यवेक्षक निवास सणस, आजीव सदस्य अर्जुन मलगुंडे यांनी यशस्वी विद्यार्थी व विभागप्रमुख सोमनाथ मिंड यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *