बारामती दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्ववंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि आणि राज्यगीताचे समूह गायन झाले.

या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रांताधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे, तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक,पत्रकार व विविध क्षेत्रातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

गुणवंत अधिकारी कर्मचारी प्रशस्तीपत्र वितरण


ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर प्रशासकीय भवनातील सभागृहात महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त तालुका प्रशासन व ज्येष्ठ स्वा.सैनिक स्व.डॉ. वर्धमान कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट, बारामती यांच्या सौजन्याने गुणवंत अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या प्रशस्तीपत्रकाचे वितरण श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक साहिल कोठारी व सचिव शेखर कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed