प्रतिनिधी – बारामती नगर परिषद, बारामती, जायंटस ग्रुप बारामती सहेली व सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सफाई कर्मचारी व महिला कचरा वेचक कर्मचारी यांचे एच. बी. तपासणी व त्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन व औषधांचे वाटप करण्यात आले. एकूण 106 महिला सफाई कर्मचारी व महिला कचरा वेचक यांची एच. बी. तपासणी व त्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन व औषधांचे वाटप करण्यात आले.
मार्गदर्शक डॉ. स्नेहलता पवार यांनी सफाई कर्मचारी यांना पोषक आहार व निरोगी आरोग्याकरिता कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर मा.मुख्याधिकारी महेश रोकडे, मा. आय. एम. ए. अध्यक्ष. श्री. आटोळे, जायंटस ग्रुप बारामती सहेली अध्यक्ष. सौ. विभा उर्फ स्नेहा देशपांडे , सौ. योजना देवळे (फेडरेशन जायंटस), सौ. सीमा टाटीया (सेक्रेटरी) सौ. भारती मुथा (डायरेक्टर), आरोग्य निरीक्षक श्री. राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक श्री. अजय लालबिगे, सोशल लॅब चे प्रतिनिधी तसेच जायंटस ग्रुप बारामती सहेली चे प्रतिनिधी सुवर्णा जोशी, उमा जोशी, वंदना गुजर, डॉ. शीतल झारगड, स्नेहा गाढवे, केतकी डुडू, सीमा खलाटे, सुचिया सोगण, सीमा सोनवणे, सारिका शहा, वैशाली स्वामी, उज्वला बोरावके, तसेच सर्व महिला सफाई कर्मचारी व महिला कचरा वेचक कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. स्नेहलता पवार यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले.