प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उत्कृष्ठ शिक्षणासोबतच दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

दिनांक २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील अंतिमवर्षातील २६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे पिरामल कॅपिटल ही एक बहुराष्ट्रीय फायनान्स आणि सल्लागार क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.

नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे २.४४ लाख रुपये वार्षिक सॅलरी पॅकेज देण्यात येणार आहे. नुकतेच कंपनीने नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लेटर ऑफ इन्टेन्ट दिले आहे.

पिरामल कॅपिटलमध्ये नोकरीसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: आकांक्षा धुमाळ,पायल बोरकर, प्रितम लव्हे, संकेत काळखैरे, रोहित जगताप, अक्षय बोरकर, सौरव कोंडे, धनराज भोंडवे, सोनाली बोरकर, प्रसाद लोखंडे, सूरज चांदगुडे, आरती भरगुडे, शुभम मुळीक, अक्षय इंगळे, सोमनाथ जाधव, तेजस खैरे, शुभम तनपुरे, गौरी केदार, मृणाल चांदगुडे, रेवती डोंबे, नवनाथ शेंडगे, सचिन कुतवळ, प्रणव ठाकूर, विशाखा कुतवळ, प्रसाद सकट, कृष्णात जगताप या विद्यार्थ्यांची पिरामल कॅपिटलमध्ये निवड झाली.

येणाऱ्या काळातही महाविद्यालय जास्तीत जास्त विद्यार्थी रोजगारक्षम बनावेत आणि दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातील असा मानस प्राचार्य डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला.

ह्या कॅम्पस ड्राईव्हसाठी पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्सचे टँलेंट ऐक्वज़िशन प्रमुख केयूर शाह व एच.आर मॅनेजर ईश्वरी गिरधर उपस्थित होत्या, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी विशाल कोरे सर यांनी हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.

सुपे महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. दिपक कुंभार आणि त्यांच्या टीम ने पिरामल कॅपिटल कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अ‍ॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शाह, श्री किरण दादा गुजर, श्री मंदार सिकची आणि मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed