प्रतिनिधी - शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि अँड इंजिनिअरिंग माळेगाव बु. या तंत्रनिकेतनमधील अंतिम वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेले ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची केएसपीजी ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि., मावळ, पुणे, या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीमध्ये २० विद्यार्थ्यांची निवड झाली. कंपनीतर्फे मनुष्यबळ विकास अधिकारी चेतन निंबाळकर, संतोष वालाप्पील व गुणाजी परब यांनी विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा व मुलाखती घेऊन आकाश वाघेला, पृथ्वीराज ओंबासे, प्रतीक शिर्के. प्रतीक घनवट, सुयश तावरे, प्रिया कदम, सिद्धार्थ तांबे, हर्षदा वाडकर, किरण जाधव, स्वप्नील पवार, निखिल तांबे, आदित्य बालुरे, वाहिद मुजावर, योगेश नाळे, सार्थक हिंगणे, मानसी गोफणे, शिवानी जाधव, ऋषिकेश शितोळे, करण शेलार, प्रज्वल कुंभार या विद्यार्थ्यांची निवड केली. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांमध्ये विषयांचे असलेले ज्ञान, काम करण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याचे कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर संतोष वालाप्पील यांनी सांगितले.
केएसपीजी ऑटोमोटिव्ह हि जर्मन मल्टिनॅशनल कंपनी असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी लागणारे अद्ययावत यंत्रणा उत्पादन करणारी कंपनी असल्याने या कंपनीमधील कामाचा अनुभव सर्वोत्तम मानला जातो, या संधीचा फायदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे संस्थेचे प्राचार्य प्रा. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. आजपर्यंत झालेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये, टाटा मोटर्स ५८, बजाज ऑटो लि. २७ , ऑरा लेझरफॅब १७, केपीआईटी ४, आणि विप्रो १ अशा एकूण १२७ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे व यापुढील काळात विषय कॉम्पोनन्ट्स, भारत फोर्ज, कमिन्स इंडिया लि., पियाजिओ व्हेहिकल्स, जॉन डिअर, भारत गिअर्स, इत्यादी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे पार पाडणेकामी प्रा. उदयसिंह जगताप, प्रा. नितीन तावरे, प्रा. स्वप्नील कोलते यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब तावरे, विश्वस्त श्री अनिल जगताप, श्री वसंतराव तावरे, श्री रविंद्र थोरात, श्री रामदास आटोळे, श्री महेंद्र तावरे, श्री गणपत देवकाते, सौ सीमा जाधव, सौ चैत्राली गावडे, सचिव श्री प्रमोद शिंदे आणि दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री सागर जाधव व संचालक मंडळ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.