प्रतिनिधी – मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याच्या निमित्ताने बारामती शहरातील वसंतनगर येथे मुस्लिम बांधवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसंतनगर व ओंकार भैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, मा.युवक अध्यक्ष अमर धुमाळ, विस्तार अधिकारी संजय जाधव मा. उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, चर्चेस ऑफ खाईस्ट इन वेस्टर्न इंडियाचे चेअरमन सुजित जाधव, ॲड.युवराज टुले, अजिज शेख, ओवेस बागवान, इफ्तिकार आत्तार, रिजवान तांबोळी, मार्गदर्शक सुरेंद्र गायकवाड, विजय जाधव, सयाजी गायकवाड, सुजित मोहन जाधव, राहुल गायकवाड, इजाज खान आदींसह मुस्लिम बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओंकार जाधव यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून ते त्यांनी सातत्याने करावे. विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणारे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे जय पाटील म्हणाले. वसंतनगर मध्ये विविध जाती धर्माचे तसेच विविध प्रांतातील लोक गेली अनेक वर्षे एकोप्याने राहतात हे या परिसराचे वैशिष्ट्य असल्याचे अविनाश बांदल म्हणाले. युवा कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून समाज उपयोगी काम केले पाहिजे ओंकार जाधव यांनी सुरू केलेला इफ्तार पार्टीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे अमर धुमाळ म्हणाले.

यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल ओंकार (भैय्या) जाधव मित्रपरिवाराच्या वतीने सुरेंद्र गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार जाधव, सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार सयाजी गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *