प्रतिनिधी – विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2023 संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभम (भैय्या) मोरे व मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे सर्व आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक श्री किरण दादा गुजर होते, यावेळी किरण गुजर यांनी उपस्थित सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते सुभान अली शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुनीर (भाई)तांबोळी यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बारामती नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, श्री अमोल जी काटे (प्रदेश कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेड), श्री.किशोरजी मासाळ (युवक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रा. काँ), श्री.सुधीरजी पानसरे (माजी नगरसेवक बा.न.प.) रोहित बनकर काँग्रेस नेते हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राजन जी कोळेकर युवा उद्योजक बारामती तसेच प्रशांत सावंत, किरण मोहिते, प्रवीण कनवाळू, नीरज राय, ऋषिकेश आडगळे, शुभम गायकवाड, सुमित अडागळे, सुरज लष्कर, मंगेश नागे यांनी सहकार्य केले. शुभम मोरे यांनी उपस्थित राहिलेल्या सर्व मित्र परिवाराचे व सहकाऱ्यांचे आभार मानले.
संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..
