वालचंदनगर:- येथील राजदत्त उबाळे आश्रमशाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे संस्थेचे सचिव श्री अनिल उबाळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व यावेळी संस्थेचे सचिव अनिल उबाळे यांनी महात्मा फुलेंचा जीवनपट अतिशय साध्या व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर कथन केला तसेच महात्मा फुले यांच्या जोडीला सावित्रीबाईंची अजोड साथ लाभल्यामुळेच महिला व मुलींमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून क्रांति करण्याचे काम या पुरोगामी जोडप्याने केले असे आपले मत विशद केले यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री सर्जेराव उबाळे हे उपस्थित होते. त्याच बरोबर संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट रंजीत उबाळे हजर होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सविता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी उबाळे, मनीषा भोसले, भीमसेन उबाळे व कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसेन उबाळे यांनी केले तर आभार माधूरी उबाळे यांनी मानले.