बारामतीत क्रांतिसूर्यास जयंती निमित्त अभिवादन

बारामती दि.११: स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त बारामतीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत काळुराम चौधरी,प्रा.रमेश मोरे,नामदेव शिंदे यांनी उपस्थितींना महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान,या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सदस्य गजानन गायकवाड,नितीन सोनवणे,सुनील चव्हाण,बबलू जगताप,राहुल कांबळे,कैलास शिंदे,सुशील भोसले,चंद्रकांत भोसले,सोमनाथ रणदिवे,नितीन गव्हाळे,शुभम मोरे,सचिन जगताप,चेतन शिंदे,गौतम शिंदे,शुभम अहिवळे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *