प्रतिनिधी – पुणे ग्रामीण जिल्हयातील गुटखा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासंदर्भात मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. आनंद भोईटे व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर यांनी गोपनीय बातमीदाराचे मार्फतीने बातमी प्राप्त केली की, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील उदय हॉटेलचे पार्कीगमध्ये एक गुटख्याने भरलेला कंटेनर उभा आहे, अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीस स्टेशनने संयुक्तपणे सदर ठिकाणी छापा टाकून इब्राहीम अब्दुल रशीद, नवाज लालनसाहब कुरेशी हे दोन इसम मिळून आले व त्यांचे ताब्यात अशोक लेलंड कंपनीचा ट्रक व रू. ३३,७५,०००/- किंमतीचा सम्राट पान मसाला सुपारी (गुटखा) असा एकुण रू. ४०,७५,०००/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हवा.स्वप्निल अहिवळे यांनी सविस्तर फिर्याद दिलेली असून सदरचा गुटखा हा कोठून आणला होता व कोणास विक्रीसाठी घेऊन चालला होता त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीसांकडून तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आनंद भोईटे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे साो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, पो. स. ई. अमित सिद पाटील, पो हवा. स्वप्निल अहिवळे व पो.हवा. अभिजीत एकशिंगे, तसेच भिगवण पो.स्टे. चे स.पो.नि. श्री. दिलीप पवार, पो.स. ई. रूपेश कदम, पो.ना.मुळीक, पो.कॉ. मुलानी, पो.कॉ. माने यांनी केलेली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचा प्रभार स्विकारल्यापासून अवैध गुटख्यावर कारवाई सुरू करत, मागील तीन महिन्यात एक कोटी रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे पुणे ग्रामीण जिल्हयात कारवाई सुरूच राहणार आहेत.