प्रतिनिधी – बारामती मध्ये दिगंबर जैन समाजाचे श्री मुनिसुव्रतनाथ महाराज दिगंबर जैन देवस्थान, बारामती वर दिगंबर जैन समाजाच्या विश्वस्तांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीच्या प्रक्रियेत ज्येष्ठ व्रतीक वालचंद नानचंद संघवी व समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व जवाहर शाह वाघोलीकर यांचे अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यामध्ये खालीलप्रमाणे पदाधिकारी व विश्वस्तांची बिनविरोध निवड करण्यात आली. १. किशोर जिनदत्त शहा सराफ अध्यक्ष २. संजय वालचंद संघवी, सचिव, ३. गौरव धनंजय कोठडिया खजिनदार, ४. पदमकुमार प्रकाशचंद मेथा, विश्वस्त ५. धवल अभय शाह (वाघोलीकर), विश्वस्त, ६. विशाल जयकुमार शहा वडूजकर विश्वस्त, ७. अतुल राजकुमार गांधी, विश्वस्त याप्रमाणे निवड करण्यात आली. तसेच ज्येष्ठ सल्लागार म्हणून व्रतीक वालचंद नानचंद संघवी व जवाहरशेठ शाह वाघोलीकर माजी नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी पुढील ५ वर्षाच्या दृष्टीने करावयाच्या कामांची तसेच राबविण्यात येणा-या उपक्रमांची चर्चा करण्यात आली. यामध्ये श्री.रामचंद मलुकचंद शहा दिगंबर जैन बोर्डींग हा ट्रस्ट बंद करून त्याचे हस्तांतर श्री मुनिसुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थान, बारामती या ट्रस्ट मध्ये विलिनीकरण करण्यात आलेला असून त्या जागेवर भिगवण रस्त्यावरील श्रावकांकरिता एक जैन मंदीर भिगवण रोड येथे असावे अशी मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे त्या जागेवर एक छोटे जैन मंदीर व येणा-या त्यागी यांचेसाठी राहण्याची व्यवस्था करणेबाबत चर्चा होऊन जागेचे नियोजन करण्यात आले. अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी मुनिसुव्रतनाथ देवस्थानचे अध्यक्ष यांनी नूतन पदाधिकारी व विश्वस्तांचे अभिनंदन केले व पुढील ५ वर्षाकरिता उत्कृष्ट काम या कार्यकारिणीच्या माध्यमातून केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.