बारामती- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही उत्साहात साजरी करण्यासाठी, सर्व समाजातील युवक वर्ग जोमाने पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. बारामती शहरात एक एप्रिल पासून सजावटीचे काम सुरू झाले असून, येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत उत्साहात व मोठ्या प्रमाणात निघणार असल्याचे चर्चेला उधाण आले आहे याच अनुषंगाने काही दिवसापूर्वी डीजे संदर्भात, समितीच्या वतीने नियम व अटी टाकण्यात आले होते. याच विषयावर दिनांक २ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या बैठकीला सर्व समाजातील युवकांनी सहभाग घेतल्याबद्दल व मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याबद्दल आलेल्या डीजे प्रेमी तसेच समाजातील सर्वच घटकातील युवकांनी बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल समितीने डीजे प्रेमींचे आभार देखील मानले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा, आदर्श ठेवून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो समाजातील गोरगरीब गरजू लोकांना,मदत करत जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले, सिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथून, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघाल्यानंतर, प्रत्येक चौकातील येणाऱ्या स्वागत कक्षांना सूचना करत मिरवणूक आल्यानंतर डीजे बंद ठेवण्यात यावा त्याचबरोबर, आलेल्या सर्व, महिला भगिनी तसेच भीमसैनिकांचे स्वागत करत, मिरवणूक पुढे गेल्यानंतर, आपण डीजे सुरू करावा अशा सूचना समितीच्या वतीने करण्यात आल्या, डीजे पाठोपाठ विद्युत रोशनाई ,एल इ डी लाईट्स, लेझरशो, बारामती शहरांमध्ये स्वागत कमानी, फलक ,झेंडे,अशा प्रकारच्या सजावटी करून, जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा, कोणतेही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेत, येणारा जयंती महोत्सव हा शांततेत पार पाडावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती चा कोणत्याही प्रकारचा विरोध राहणार नाही असे समितीने,जाहीर केले, त्याचबरोबर युवक वर्गाला समितीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात, जयंती ही एकच निघणार असून कोणीही, समाजामध्ये दोन जयंती निघणारा असल्याचा अपप्रचार करू नये, असे देखील समितीच्या वतीने सांगण्यात आले, बारामती मध्ये पारंपारिक पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होईल असे सांगून ही बैठक संपन्न झाली.