प्रतिनिधी – स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत प्रक्रिया केंद्रावर काम करणारे कचरा वेचक यांचे प्रशिक्षण बारामती नगरपरिषद, बारामती चे मुख्याधिकारी श्री महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१ मार्च २०२३ रोजी बारामती नगर परिषद व सोशल लॅब एन्व्हारमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. यामध्ये कचरा वेचकाना आरोग्य व स्वच्छते बाबत माहिती देण्यात आली, तसेच कचरा वेचक यांना प्रत्यक्ष काम करत असताना. सुरक्षा साधने वापरण्याचे महत्व व सुरक्षा साधने न वापरल्यास आरोग्यावर होणारे परिणाम, व्यक्तिक स्वच्छता याची माहिती देण्यात आली, त्याच बरोबर मा. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी येत्या काही दिवसात कचरा वेचकांचे काम सोपे व रोजगार जास्तीत जास्त कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी कचरा वर्गीकरणासाठी सुसज्य MRF सेंटर उभारून कन्व्हेयर बेल्ट च्या साह्याने सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण 18 प्रकारांमध्ये केले पाहिजे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री महेश रोकडे यांनी केले.
तसेच सुका कचरा प्रक्रिया केंद्र (MRF सेंटर) येथील काम करणाऱ्या सर्व ५० कचरा वेचकाना आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व सोशल लॅब चे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल ठाकूर यांच्या हस्ते सुरक्षा साधने वाटप करण्यात आले. यामध्ये,ॲप्रोन, हॅन्ड ग्लोज, मास्क, टोपी, इ. सुरक्षा साधने वाटप करून प्रक्रिया केंद्रावरील सर्व कचरा वेचक कर्मचारी यांना सुरक्षा साधने वापरण्याचे फायदे व महत्त्व पटवून देण्यात आले. व यावेळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, कुणाल लालबिगे, अक्षय नाईक, इतर अधिकारी कर्मचारी, सोशल लॅब चे प्रतिनिधी व कचरा वेचक एकूण 55 उपस्थित होते.