बारामती दि.२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माया मच्छिंद्र इव्हेंट प्रस्तुत महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा रविवारी बारामतीतील जयश्री गार्डन येथे उत्साहात सपंन्न झाली.बी.एम.टी डान्स क्रू ने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धे मध्ये मुंबई पुण्यासह महाराष्ट्राबाहेरील स्पर्धकांनी देखील सहभाग घेतला होता.हि स्पर्धा सर्व वयोगटातील मुलामुलींसाठी खुली असल्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येक स्पर्धकाने आणि त्यांच्या टिमने अप्रतिम सादरीकरण केले.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एंजेल डान्स अकॅडमी पुणे,द्वितीय पारितोषिक स्मॉल गॅलॅक्सि क्रू,पुणे तर तृतीय पारितोषिक फाईव्ह स्टार क्रू,पुणे यांनी पटकाविले.

या कार्यक्रमाला,बारामती चे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर,विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यलयीन सचिव हनुमंत पाटील,दुर्योधन भापकर,पिंटूभाऊ गायकवाड,माजी नगरसेवक बिरजू मांढरे उपस्थित होते.तर सिने अभिनेत्री माधुरी पवार यांनी देखील हजेरी लावली

दरम्यान,यावेळी बी.एम.टी डान्स क्रूने बारामती शहरातील 5 वर्षांपुढील सर्वांसाठी दोन महिने मोफत डान्स कॅम्पची मोठी घोषणा केली असून इच्छुक असणारांनी संपर्क करण्याचे आवाहन बी.एम.टी डान्स क्रू चे सुमित मोहिते,ओंकार शहासने,रोहित वाघमोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *