प्रतिनिधी – मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोखा निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण, शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीयेत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे. कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले, शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास असे अनेक कारणांमुळे चिमण्यांचे प्रमाण कमी झालेल्या आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन चिमण्यांची घरटी बनवून अनेक ठिकाणी घरटी देण्याचा प्रयत्न केला त्या वेळी उपस्थित बारामती पोलीस स्टेशनचे मोरे (पोलीस निरीक्षक),अमोल नरुटे ,शिंदे (पोलीस पाटील पारवडी), त्याच बरोबर बारामती नगरपरिषद आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी घरटे देण्यात आली त्याच बरोबर शिनगारे (वैदकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसुफळ) वाघमोडे सिस्टर(आरोग्य सेविका),चव्हाण सिस्टर (आरोग्या सेविका), झेलकर सिस्टर (अर्धवेळ परिचर) उपस्थित होते.