प्रतिनिधी – टी सी महाविद्यालया मध्ये पार पडला क्रीडा वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये दि .१८ मार्च रोजी वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ मोठया जल्लोशात पार पडला. विविध खेळात विशेष यश संपादन केलेल्या तब्बल १७० खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनींचा रोख पारितोषिक, ट्रॅकसूट आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालय, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऐकून ६४ हजार रुपयाची रोख पारितोषिके खेळाडूंना देण्यात आली. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ .भाग्यश्री बिले-कसगावडे जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर आणि श्री. महादेव कसगावडे क्रीडा उपसंचालक पुणे विभाग हे उपस्थित होते . प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत असताना, खेळाडूंनी सरावामध्ये कमी पडता कामा नये. खेळाडूंनी यश मिळविण्यासाठी खेळामध्ये सातत्य, समर्पकता आणि जिद्द अंगी बाळगली पाहिजे असे सौ.भाग्यश्री कसगावडे यांनी सांगितले. श्री.महादेव कसगावडे यांनी त्यांचा खेळाडू ते क्रीडा उपसंचालक पदापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. शासनाने क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या खेळाडूंसाठी नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडूंनी त्या करिता प्रयत्न केले पाहिजे. आणि नीरज चोप्रा सारखे अनेक खेळाडू तयार झाले पाहिजे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. संस्थेचे सन्माननीय सदस्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रगुप्त शाह वाघोलीकर यांनी विजेत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. खेळाडूंनी कधीही थांबू नये, सतत लढत राहावे असा सल्ला या प्रसंगी त्यांनी खेळाडूंना दिला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी केले. महाविद्यालयाच्या हिरकमोहत्सवी यशाचे खरे मानकरी हे महाविद्यालयातून यश संपादान केलेले विद्यार्थी आहेत असे गौरवपूर्ण उद्दगार त्यांनी काढले. क्रीडा पारितोषिक अहवालाचे वाचन जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ.गौतम जाधव यांनी केले. पारितोषिक वितरण वाचन प्रा . अशोक देवकर यांनी केले.
एशियाओ शियाना कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल प्रणव पोमणे , दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मंथन भोकरे अश्या विविध स्पर्धेमध्ये विशेष यश संपादन केलेल्या अनेक खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, रजिस्टार, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विवेक बळे यांनी केले तर आभार डॉ.गौतम जाधव यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed