प्रतिनिधी – श्री. अजित पवार, विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्य यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम बारामती येथे ‘‘कारभारी प्रिमिअर लिग 2023’’ चे आयोजन दिनांक 20 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान करण्यात आलेले आहे. कारभारी प्रिमिअर लिग 2023 मध्ये एकुण 6 (सहा) संघ सहभाग घेणार असून त्याकरीता बुधवार दिनांक 15/03/2023 रोजी हाॅटेल सिटी इन याठिकाणी संघांचे लिलाव उत्साहपुर्ण वातावरणामध्ये पार पडले. यामध्ये काटेवाडी पाॅवर्स या संघास श्री. वैभव काटे यांनी सर्वात जास्त 2,80,000/- रूपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केले.
सदर लिलावामध्ये कसबा वाॅरिअर्स या संघास अॅड. श्रीनिवास वायकर यांनी 2,50,000/- रूपयांची बोली लावून खरेदी केले, तसेच सांगवी लायन्स या संघास श्री. योगेश (भैय्या) जगताप, माजी नगराध्यक्ष बा.न.प. तथा संचालक दि माळेगांव सहकारी साखर कारखना लि. यांनी 2,25,000/- रूपयांची बोली लावून खरेदी केले त्यानंतर बारामती स्मॅशर्स या संघास उद्योजक श्री. निलेश कुलकर्णी यांनी 2,15,000/- रूपयांची बोली लावून खरेदी केले तसेच माळेगांव किग्स् या संघास प्रसिध्द उद्योजक श्री. रवि (आबा) काळे यांनी 2,05,000/- रूपयांची बोली लावून खरेदी केले आणि सोमेश्वर कोब्राज या संघास बारामतीचे श्री. सतिश ननवरे (वैष्णवी ग्राफीक्स) यांनी 2,00,000/- रूपयांची बोली लावून खरेदी केले.
कारभारी प्रिमिअर लिग 2023 या स्पर्धेच्या संघांच्या लिलावाचे उद्घाटन मा. श्री. विजय पाटील , तहसिलदार बारामती यांचे हस्ते करण्यात आहे. संघांच्या लिलावाची प्रक्रीया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व लिलाव प्रक्रीया श्री. ज्ञानेश्वर (मामा) जगताप यांनी केले व के.पी.एल. च्या वतीने श्री. प्रशांत (नाना) सातव, श्री. हनुमंत मोहिते व श्री. सचिन माने यांनी सर्व संघमालकांचे अभिनंदन केले. लिलाव प्रक्रीया पार पाडण्याकरीता श्री. योगेश व्हटकर व श्री. वसीम शेख यांनी मोलाचे योगदान दिले. सदर वेळेस के.पी.एल. 2023 मधील खेळाडूंचा लिलाव रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी हाॅटेल सिटी इन येथे होणार असून त्यामध्ये नोंदणीकृत खेळाडूंचा सामावेश करणार असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले.