ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरी व दरोड्यांना आळा बसू शकेल – गणेश लोकरे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम ग्राम सुरक्षा यंत्रणा

सोलापूर, प्रतिनिधी : आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल-फ्री क्रमांकावर(18002703600) फोन केल्यास एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांशी संपर्क साधला जाईल.त्यातुन इतरांना सावध करता येईल,तसेच मदतीसाठी बोलाविता येईल ही यंत्रणा ग्रामपंचायतीमार्फत गावात राबवली जाणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ग्रामीण भागासाठी प्रभावी ठरेल.ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरी व दरोड्यांना आळा बसू शकेल.पोलिस यंत्रणेस कायदा व सुव्यवस्था कायम राखणे कामे नागरिकांचे सहकार्य मिळते.प्रशासनाला नागरिकांशी जलद संपर्क साधता येतो.                

सदर गावांमध्ये आपत्कालीन ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयी जनजागृती करण्यात आली.तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणे विषयीचे पुस्तकाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अकलूज पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड साहेबाच्या सूचनेनुसार,गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी सोलापूर, विक्रमसिंह घाटगे जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा, पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,अनिकेत भोसले संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, आदिंसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे मार्गदर्शन करताना म्हणाले,ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबवल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास व जिल्ह्यातील महत्त्वाची माहिती नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचवणे सुलभ होईल.ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहे.संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा आहे.गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत आहे.संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600 आहे.यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो.एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य आहे.यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेची आवश्यकता आहे.
आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांत ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात आली असुन चोरी- दरोड्याची घटना, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले हरविणे, वाहन चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, आग जाळीताची घटना इ. घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे तातडीने मदत मिळणे व दुर्घटनांना आळा घालणे प्रभावीपणे शक्य होत आहे. सर्व नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा संकटाच्या वेळी प्रभावी वापर करावा व पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

गावांमध्ये आपत्कालीन ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयी जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी अकलूज पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड साहेबाच्या सूचनेनुसार,गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी सोलापूर , विक्रमसिंह घाटगे जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा,पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव,
पोलीस सहाय्यक निरीक्षक पानसरे पोलीस सहाय्यक निरीक्षक मारकड पोलिस नाईक जाधव पोलिस हेड कॉन्स्टेबल गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदनशिवे पोलिस हेड कॉन्स्टेबल घाटगे पोलिस हेड कॉन्स्टेबल मिरगणे, पिंगळे,शिवतोडे,बोराटे, झिंजे सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,अनिकेत भोसले संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा यांच्यासह गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, पोलीस पाटील,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,पत्रकार बांधव, डॉक्टर ,शिक्षक तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते आदी सर्व उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *