बारामती, प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील देउळगाव रसाळ येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून व अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदा महिला संघ , नर्सिंग कॉलेज शारदा नगर , स्वयंभू हॉस्पिटल , AK लॅब , ग्रामपंचायत देऊळगाव रसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी सर्व रोग निदान शिबीर , औषध वाटप तसेच डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे व बचत गट विविध उद्योग व्यवसाय कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन सौ. सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला डॉ. अमित भापकर , डॉ. साकेत जगदाळे , डॉ. रेश्मा भापकर , डॉ. सुजित गवळी , डॉ. सुनिल पवार , डॉ. प्रशांत माने , डॉ. आनंद गवसने , डॉ. प्रतिक वाळूंजकर , डॉ. मिलन गवसने , डॉ. संकेत नाळे , डॉ. ऋतुजा रसाळ , AK लॅब चे अरविंद मुळीक , अक्षय ओमासे , अक्षय माने, HV देसाई हॉस्पिटलची सर्व टीम ह्या सर्वांनी आरोग्य शिबीरात उपस्थित राहून सर्व महिलांच्या विविध तपासण्या केल्या या वेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी चे हि खूप मोठे सहकार्य केले.

या वेळी सुनंदा पवार म्हणाले मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील महिलांसाठी सुप्रियाताई व संस्थेच्या शारदा महिला संघाच्या माध्यमातून बारामती , इंदापूर , पुरंदर , या तालुक्यात महिलांना एकत्र करणे , महिला बचत गट स्थापना , प्रशिक्षणे,व्यवसाय , मार्केटींग , आर्थिक मदत , आरोग्य तपासणी , व्यवसाय निर्मिती यासाठी कार्य केले जात आहे. ग्रामीण भागात आजही आरोग्याविषयी खूप उदासीनता आहे , म्हणूनच संस्था महिला आरोग्यासाठी ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर काम करत आहे. आज देऊळगाव रसाळ परिसरातील शारदा महिला संघ सभासद 360 महिलांच्या वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या. कॅन्सर सारखा आजार गंभीर बनत असल्याने वेळोवेळी आरोग्याच्या तपासण्या करून वेळीच महिलांनी सावध राहून काळजी घेतली पाहिजे यासाठी सुप्रियाताई सुळे व अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा विश्वस्त सुनंदा पवार यांनी हे सर्व रोग निदान शिबीर 3 तालुक्यात आयोजित केले आहे , त्यापैकी हे आजचे 4 थे शिबीर झाले.

सुनंदा पवार यांनी सांगितले की महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे , आताच्या युगात प्रत्येक स्त्री ही कुटुंबासाठीसमाजासाठी झटत असते पण ती स्वतःकडे दुर्लक्ष करते पण योग्य वेळी आपण डॉक्टराचा सल्ला व उपचार , घेतले तर कॅन्सर सारख्या आजारावर ही मात करू शकतो म्हणून थोडावेळ आपल्या स्वताच्या जीवनासाठी दिला पाहिजे असे मत यांनी व्यक्त केले, शिबिरात,महीलाच्या त्वचा , कॅन्सर , दातांच्या , किडनी पोटविकार मुतखडा , डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले इसिजी बीपी शुगर , हिमोग्राम चेक करण्यात आले 183 महिलांना चष्मे वाटप केले व मोती बिंदू असणारे यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा महिला संघाचे प्रमुख बाळासाहेब नगरे , प्रकाश साळुंके व नर्सिंग कॉलेज चे मनिषा मॅडम सर्व स्टाफ , अभिषेक जगताप , तात्या शेलार , गजानन मोकाशी , सीमा पानसरे , निकिता महामुनी , सुनिता भादेकर तसेच सर्व ग्रामस्थ , शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. संभाजी होळकर , देऊळगाव रसाळच्या सरपंच सौ. वैशाली वाबळे , उपसरपंच दत्तात्रय वाबळे , अंकुश रसाळ , सुरेश रसाळ , राजेंद्र खराडे , शारदा खराडे , भरत खैरे , प्रमोद खेत्रे , संजय पोमन , दिलीप परकाळे , लक्ष्मण जगताप , दत्तात्रय लोंढे , आत्माराम वाबळे , श्रीरंग रसाळ , शौकत कोतवाल , राहुल लोंढे ,आनंद रसाळ , मनीषा वाबळे , मीरा रसाळ , शितल रसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री दिपक वाबळे व आभार उपसरपंच दत्तात्रय वाबळे यांनी मानले , यावेळी 465 पेक्षा जास्त महिला उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed