प्रतिनिधी - शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, माळेगाव व महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ५ मार्च दरम्यान तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित केली होती.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (बिमा) अध्यक्ष श्री धंनजय जामदार यांनी सांगितले कि विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे तसेच बारामतीच्या चोहो बाजूनी वाढत असलेल्या एमआईडीसी मधील मोठया कंपन्याना लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करण्यासाठीचे छोटे-मोठे उद्योग विद्यार्थ्यांना उभे करावेत त्यासाठी बिमा सर्वोतपरी मदत करेल. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य प्रा. राजेंद्र वाबळे यांनी या कार्यशाळेच्या तीन दिवसांमध्ये विविध विषयांवर तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेऊन डिप्लोमाचे विद्यार्थी उद्योजक बनावेत यासाठी दरवर्षी असे शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. पल्लवी बर्गे यांनी केले तर उपस्थित पाहुण्याचे आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पुरुषोत्तम जाधव यांनी मानले.
दि. ३ मार्च ते ५ मार्च दरम्यान पार पडलेल्या या कार्यशाळेमध्ये पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षामधील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उद्योजक का बनायचे? बाजारात संधी काय आहेत? सेल आणि मार्केटिंग कसे करायचे? विविध शासकीय योजना, शासकीय अनुदाने, शासकीय वित्तीय संस्था तसेच बँकेतील विविध कर्ज योजना, प्रकल्प अहवाल तयार, व्यक्तीमत्व विकास, ध्येयनिश्चिती आणि संभाषण कौशल्य अशा विविध विषयांवर संस्थेचे सचिव श्री प्रमोद शिंदे, एमसीईडीचे माझी विभागीय अधिकारी श्री सुरेश उमाप, समन्वयक श्री रामदास पवार, तज्ञ मार्गदर्शक श्री किरण इनामदार श्री राजेंद्र फुकने, श्री सुनील शेटे आदींनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडणेकामी एमसीईडी चे समन्वयक श्री रामदास पवार, प्रा. पुरुषोत्तम पवार, प्रा. उदयसिंह जगताप, प्रा. नितीन तावरे, प्रा. प्रमोद धायगुडे, प्रा संदीप माळशिकारे यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब तावरे, विश्वस्त श्री अनिल जगताप, श्री वसंतराव तावरे, श्री रविंद्र थोरात, श्री रामदास आटोळे, श्री महेंद्र तावरे, श्री गणपत देवकाते, सौ सीमा जाधव, सौ चैत्राली गावडे, सचिव श्री प्रमोद शिंदे आणि दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री सागर जाधव व संचालक मंडळ यांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले.
Post Views: 373