प्रतिनिधी – बारामती येथील कीप ऑन रोलीन स्केटिंग क्लब मधील मुले National स्केटिंग स्पर्धेसाठी खोपोली येथील याक पब्लिक स्कूलच्या रिंकवर गेली होती. ज्यामध्ये १. सुजय गवळी २.हर्ष खुराना ३.स्वर्ण शहा ४.शिवम मस्तद ५.रामप्रसाद खन्ना ६.अन्वेष वायफलकर ७.राजवर्धन निंबाळकर ८. वेदांत आटोळे ९. श्रेया गोरे या ९ मुलांनी सहभाग घेतला होता व यातील ४ मुलांनी मेडल्स मिळवली आहेत. ही मुले गेले २ महिने स्केटिंगची रोड प्रॅक्टिस करत आहेत. बारामती मध्ये स्केटिंग ची रिंक नसली तरी रस्ते चांगले असल्याने वेगवेगळ्या रस्त्यांवर ही मुले रोज प्रॅक्टिस करतात व त्याच प्रॅक्टिस वर ते आता national लेव्हलवर मजल मारत आहेत. यामध्ये under 5 to under 16 पर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धा मिशन ओलंपिक गेम असोसिएशन यांनी भरवल्या होत्या.या मुलांना कीप ऑन रोलीन स्केटिंग क्लबचे कोच तनिष्क शहा (National player) यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *