प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधलेल्या कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजात गावागावात, शहरात उत्साहाने दिवाळी साजरी झालेली आहे. लोणारी समाजात जल्लोषाचे वातावरण आहे. याचे एकच कारण लोणारी समाजाचा उत्कर्ष होणार ही अपेक्षा समाज बाळगून आहे. यामुळे श्री. रविंद्र भाऊ धंगेकर यांच्यावर आता दुहेरी जबाबदारी पडली आहे. एक म्हणजे कसबा मतदार संघ याचा कायापालट व दुसरे म्हणजे लोणारी समाजाचा उत्कर्ष या दोन्ही जबाबदाऱ्या श्री. रविंद्रभाऊ धंगेकर यशस्वीपणे पार पाडतील असा आम्हां सर्वांना विश्वास वाटतो. लोणारी समाजाचे अध्यक्ष व आधारस्तंभ मा. श्री. रविंद्र भाऊ धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून अकरा हजार मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाले, या निमित्ताने समस्त बारामती शहर लोणारी समाज आणि रविंद्र भाऊ धंगेकर यांचे हितचिंतक यांनी शहरातील चौकाचौकात शुभेच्छा फलक (बॅनर) लावुन शहरातील नागरिकांना पेढे वाटून आणी फटाके फोडुन मोठ्या जल्लोषात आनंद उत्सव साजरा केला. यावेळी प्रमुख उपस्थिती अँड.आकाश मोरे म.प्रदेश काँग्रेस सदस्य, श्री. रोहित बनकर म. प्रदेश उपाध्यक्ष ओ.बी.सी राष्ट्रीय काँग्रेस, श्री. रुपनवर सर या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन रविंद्र भाऊ धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या..! तसेच पुढील राजकीय वाटचालीस समस्त समाज बांधव भगिनींनी शुभेच्छा व्यक्त केल्या ! यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन श्री. तानाजीराव करचे सर, श्री. सिद्धार्थ भाऊ गिते, श्री. अमोल कुलट, श्री. धनेश करचे सर, सौ. द्वारका ताई कारंडे, सौ. आशा ताई आटपडकर, दत्तात्रय करचे, संजय काळेल, प्रकाश करचे, अँड. भालचंद्र होळकर, अँड. अनिल होळकर, यांच्या माध्यमातून करण्यात आले. हा विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मारुतीराव लिंबरकर, संजय कारंडे सर, प्रथमेश गोडसे, किसन कर्चे सर, तात्यासाहेब राणे, धंगेकर, दिपक वाघ, दोडमिसे सर,‌ महिला भगिनीं सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *