प्रतिनिधी – आज दि. 2/3/2023 रोजी बारामती मतदारसंघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ. भारती शेवाळे , राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा पक्ष निरीक्षक वनिता बनकर ,बारामती शहर तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , बारामती शहर राष्ट्रवादी अध्यक्ष जय पाटील यांच्या मार्गदर्शनाने बारामती शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष व माजी नगरसेविका सौ. आरती गव्हाळे (शेंडगे) तसेच बारामती शहर ओबीसी सेल महिला अध्यक्ष सौ. द्वारका कारंडे, तसेच बारामती सामाजिक न्याय विभाग सेलच्या महिला अध्यक्ष सौ. रेश्मा ढोबळे तसेच पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला उपाध्यक्ष सौ .सुनीता मोटे यांच्या नियोजनानुसार बारामती शहर प्रशासकीय भवन या ठिकाणी वाढती महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये बारामती शहरातील प्रशासकीय भवन येथे युवतींनी व महिलांनी मिळून गॅस सिलेंडरची टाकी उलटी ठेवून व चुलीवरती स्वयंपाक करून थाळी वाजवून आणि केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन आगळे वेगळे आंदोलन केले. महागाई कमी होण्यासाठी व आपल्या संसाराला दरवाढीची बसणारी झळ कमी करण्यासाठी सर्व महिलांनी मिळून बारामतीचे प्रांतअधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले. या आंदोलनामध्ये बारामती शहरातील विविध ठिकाणच्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच सर्व सामान्य महिलाही या आंदोलनावेळी आक्रमक झाल्या होत्या.
यावेळी सौ. प्रियांका घोरपडे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस सौ. प्रियांका चौरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस सौ. आशा आटपाटकर महिला कार्याध्यक्ष बारामती शहर सौ. पुष्पा देवकाते महिला सरचिटणीस पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग सौ. संगीता पाटोळे अध्यक्षा बारामती तालुका सामाजिक न्याय विभाग सौ नुसरत भाभी इनामदार ओबीसी सेल तालुका अध्यक्ष महिला, सौ. सुचित्रा साळवे महिला सरचिटणीस बारामती तालुका तसेच सौ. विजया खटके धारक ताई,आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच बारामती शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अविनाश बांदल, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष साधु बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष विशाल जाधव, तसेच पत्रकार तैनुर शेख, निलेश जाधव ,इत्यादी उपस्थित होते.