माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) मळद-बारामती गावामध्ये विविध नामांकित सेंद्रिय, जैविक व रासायनिक खते व औषधे बनविणार्या कंपन्यांतर्फे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादनासाठी “ऊस पिक वाढ स्पर्धा 2021″ भरवलेली असुन या कंपन्यांनी स्वतःची खते औषधांचे किट शेतकर्यांना मोफत देयचे असुन, जी खते बाजारातून आणावी लागतील ती शेतकर्यांनी आणायची आहेत, तसेच सर्व कामकाज व खर्च ऑन पेपर वर रेकॉर्ड ठेवायचे आहे. या स्पर्धेसाठी महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्यूडयू फ्री फार्मस असोसिएशन महाराष्ट्र” (मोर्फा). यांच्या संकल्पनेतून व बारामती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली.बारामती”. तसेच “एकता शेतकरी ग्रुप, मळद”, यांच्या सहकार्यातून माळेगाव सहकारी साखर कारखाना ली शिवनगर व ग्रामपंचायत मळद यांच्या कार्यक्षेत्रातील मळद शिवारातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस प्रात्यक्षिक प्लाॅटचे नियोजन केले आहे, सेंद्रिय व जैविक खते औषधे बनवणार्या कंपन्यांसाठी भरवलेल्या एक एकराचा ऊस प्रात्यक्षिक डेमो प्लाॅट ऊस लागणीपासून ते ऊस तोड होईपर्यंत, पाणी व माती परीक्षण करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन व शेतजमीनीचा सेंद्रिय कर्ब व सामु कुठेही कमी न होता सर्व दैनंदिन कामकाज ऑन पेपर वर घेऊन ही पीक स्पर्धा आयोजित केली आहे, सदर ऊस प्लाॅटचे नियोजन एकाच गावात केलेले आहे, कारण जमीन, साखर कारखाना, पाणी व हवामान एकाच प्रकारचे असल्यामुळे कोणालाही कुठलीही अडचण सागंता येणार नाही. आजपर्यंत 32 कंपन्यांनी सहभाग नोदंवला आहे, सदर कंपन्याची खते,औषधे शेतकर्यांचे शेतावर पोहोच झाली आहेत. या ऊस प्रात्यक्षिक डेमो प्लाॅटचे नियोजनासाठी श्री प्रल्हाद वरे व श्री प्रशांत शेंडे हे गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न करत होते, अखेर त्यांच्या या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी सहभाग घेऊन यशस्वी केले. अजुनही नामांकित कंपन्यांनी फोन करून सहभागी होण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.