बारामती- येथील ब्ल्यू पॅंथर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आग्रही युवानेते, आंबेडकरी चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांची वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व महासचिवपदी पुनःश्च निवड करण्यात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांनी सदरील निवड पत्र देऊन प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.
मंगलदास निकाळजे हे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असणारे आग्रही कार्यकर्ते आहेत. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांसाठी आग्रही भूमिका घेऊन त्यांच्यावरील अन्याय अत्याचार जाब विचारण्यासाठी ते सतत आग्रही असतात. त्याच बरोबर अनेक विधायक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक कार्यक्रम व उपक्रमांचे ते आयोजन करीत असतात. चांगले संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे युवकांचे फार मोठे संघटन त्यांच्याबरोबर असते यामुळे वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यात वाढली जाणार असल्याच्या चर्चा आहेत मंगलदास निकाळजे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडी नंतर मंगलदास निकाळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा पूर्व महासचिव पदी माझे काम पाहून मला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांच्या मार्गदर्शन खाली पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम अतिशय जोमाने करणार आहोत व कार्यकर्त्यांची फोज उभा करणार करुन येणाऱ्या निवडणूका मध्ये मोठ्या ताकतीने उतरणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा पुणे जिल्ह्यामध्ये फडकवून आदरानीय ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed