माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) भारतीय कृषी अनुसंधन परिषद ( भाकृअनुप ) (ICAR ) राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान (NIASM) ( समतुल्य विश्वविद्यालय ) माळेगाव, बारामती पुणे, महाराष्ट्र. या केंद्र सरकारच्या संस्थेचा 15 वा स्थापना दिवस ( वर्धापन दिन ) साजरा झाला. त्यावेळी विविध कार्यकामाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी गेली 9 वर्षा पासुन पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या SPK शेती पद्धतीने व त्यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेती करणारे व देशी / गावरानी भाजीपाला बीयांचे 120 प्रकार जतन, सवंर्धन करून देशी बीज बँक बनवून बँकेच्या माध्यमातून नैसर्गिक शेती व देशी/ गावरानी भाजीपाला बियाण्यांचा प्रचार प्रसार करत नावीन्य पूर्ण उपक्रम राबवत असल्याने श्री मिलिंद वाल्मिक सावंत, त्यांच्या आई समिंद्राताई वाल्मिक सावंत व अर्चना मिलिंद सावंत यांचा सहकुटुंब सन्मान पत्र, शाल व स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्मान सत्कार, गौरव करण्यात आला. त्या वेळी NIASM या संस्थेचे सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ रेड्डी, डॉ कुऱ्हाडे, डॉ गांधी, डॉ तायडे डॉ निर्मले तशेच वरिष्ठ अधिकारी, सर्व स्टाफ व निवडक शेतकरी हजर होते. वर्धापन दिनानिमित्त शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.