बारामती दि. २१ : क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आणि उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.

यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बारामतीचे अनिल सातव, बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विवेक पंचनांदिकार, सदस्य अविनाश लगड, प्रा. लक्ष्मण मेटकरी, नीलम तावरे, बॅडमिंटन असोसिएशनचे पंच, जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक आदी उपस्थित होते.

स्पर्धेत विजयी झालेल्या संघांची नावे- मुले -१४ वर्ष वयोगट प्रथम- भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचंदनगर, ता. इंदापूर, द्वितीय
-पोतदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव, ता. हवेली, तृतीय- ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल, मुळशी, १७ वर्षे वयोगट- प्रथम- पी.आय.सी.टी मॉडेल स्कूल, मुळशी, द्वितीय- अनंतराव कुलकर्णी इंटरमेडीयट स्कूल, जुन्नर, तृतीय- पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, ता. हवेली, १९ वर्षे वयोगट- प्रथम- सुर्यदत्त नॅशनल स्कूल मुळशी, द्वितीय- शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, ता. बारामती, तृतीय- सी.टी. बोरा कॉलेज, शिरूर.

मुली-१४ वर्ष वयोगट प्रथम- पी.आय.सी.टी मॉडेल स्कूल, मुळशी, द्वितीय- विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मेडियम स्कुल सीबीएससी, बारामती, तृतीय- पवार पब्लिक स्कुल, नांदेड सिटी,
ता. हवेली, १७ वर्षे वयोगट- प्रथम- पी.आय.सी.टी मॉडेल स्कूल, मुळशी, द्वितीय-आर. एम. वर्ड स्कुल, सिंहगड, ता. हवेली, तृतीय- वर्धमान विद्यालय वालचंदनगर, ता. इंदापूर, १९ वर्षे वयोगट- प्रथम- विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती, द्वितीय- श्री शिव छत्रपती महाविद्यालय जून्नर तृतीय- श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कुल आणि ज्यु कॉलेज, दौंड.

स्पर्धेतील विजेत्यांना बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विवेक पंचनांदिकार यांच्या हस्ते चषक देवून सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *