प्रतिनिधी – दिनांक २१ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील स्मार्ट संस्थेचे विद्या प्रतिष्ठानच्या व्ही.आय.आय.टी मध्ये वसुंधरा वाहिनीसोबत ‘क्लायमॅट लिटरसी’ वर्कशॉप संपन्न झाले. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी वसुंधरा वाहिनीला SMART चे क्लायमॅट चेंज तज्ञ प्रियांका गरोडिया आणि रेहान गालिब यांनी भेट देऊन Climate Change Ambassador विद्यार्थ्याशी संवाद साधला.
नवी दिल्ली च्या Seeking Modern Application For Real Transformation, आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने वसुंधरा वाहिनी हवामान साक्षरतेच्या कार्यक्रमाची मालिका प्रसारित करत आहे. एक विद्यार्थी साक्षर केला तर तो त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी यांना साक्षर करू शकेल या उद्देशाने पर्यावरण रक्षणासाठी climate Change Ambassador विद्यार्थी जनजागृतीचे काम करत आहेत.
या प्रसंगी, आपण पर्यावरण रक्षण केले तरच आपले आरोग्य चागले राहील असे प्रतिपादन व्ही. आय. आय. टी. चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी केले. या कार्यक्रमामध्ये पोषण आहारावर मार्गदर्शनपर कार्यक्रमांबद्दल लॅक्टेशन मॅनेजमेंट कन्सल्टंट डॉ. मनीषा तावरे, उत्कृष्ट स्क्रिप्ट रायटिंग बद्दल MES हायस्कुलचे शिक्षक रवींद्र गडकर, उत्कृष्ट पारंपरिक गीत लेखन बद्दल VP CBSC इंग्लिश मिडीयम स्कुलच्या टीचर मनीषा चव्हाण, उत्कृष्ट नभोनाट्य लेखन बद्दल सौ. माधवी गोडबोले आणि सायली कासार आणि बेस्ट कम्युनिटी पार्टीसिपेशन बद्दल अक्षय कांबळे यांना वसुंधरा वाहिनीच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा अजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोक प्रभुणे, संस्थेच्या सचिव अॅडव्होकेट नीलिमा गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, डॉ. आर. एम. शहा, श्री. मंदार सिकची सर्व विश्वस्त मंडळ, रजिस्ट्रार श्रीष कुंभोज तसेच व्ही.आय.आय.टी.चे डायरेक्टर डॉ.आनंद देशमुख, ऑफिस सुपरीनटेंडेंट संजय जगताप यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमासाठी एमबीए व एमसीएचे विद्यार्थी व शिक्षक तसेच बारामती नगरपरिषद, महिला व बालकल्याण प्रमुख आरती पवार, सहाय्यक कविता खरात यांनी हरित शपथ घेतली.
कार्यक्रमामध्ये विद्या प्रतिष्ठान आर्टस् कॉमर्स अँड सायन्स ज्यूनिअर विभागाच्या प्राध्यापिका शीतल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ. आशा मोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. क्लायमॅट चेंज अँबॅसिडर चैतन्या भोसले यांनी सूत्रसंचालन केले, आरजे स्नेहल कदम यांनी आभार मानले.
अशोक ओमासे, सचिन केसकर, चेतन धुमाळ यांनी तंत्र सहाय्य केले.
