प्रतिनिधी- तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागा कडून गोरगरीब जनतेच्या होणाऱ्या लुटीबाबत, पिक विमा अनुदान रखडल्या बाबत, लोणी देवकर – निमगाव केतकी रस्ता, बारामती – इंदापूर रस्ता, निमगाव केतकी – काटी रस्ता व इतर रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या निकृष्टितेबाबत व रस्ता रुंदीकरण करताना ठेकेदारांकडून सुरक्षा योजनेच्या कामांमध्ये होणाऱ्या अभावाबाबत, मौजे लाखेवाडी येथील ग्रामसेवक खरमाटे यांच्या विरोधातल्या तक्रारींची चौकशी होण्याबाबत, रास्त भाव दुकानदारांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराबाबत तसेच ऑनलाइन पद्धतीने शिधावाटप करताना अडचण आल्यास ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप व्हावे यासाठी व अशा प्रकारच्या अनेक गलथन कारभाराच्या निषेधार्थ दि १५/१२/२०२२ रोजी सकाळी शिवसेना युवासेनेच्या वतीने युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस सुरज सानप यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आले.
“आमचे सरकार सर्वसामावेक्षक आहे,भ्रष्टाचारी नाही, आम्ही विचारात्मक धोरणावर एकत्र आलो असे सध्याचे चालू सरकार दिंडोरी पिटत असते मग रस्त्याला खड्डे, नागरी सुविधा केंद्राकडून होणारा भ्रष्टाचार, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई नागरिकांना मिळाली नाही असे प्रकार का घडत आहेत. असा सवाल उपस्थित करत आमचे सरकार असताना शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले, ठेकेदारांनी नियमाप्रमाणे कामे न केल्यास व इतर गोष्टींवर तात्काळ कार्यवाही होत होती.परंतु सध्याच्या सरकारमध्ये असला कोणताही प्रकार नसून आताचे खोके सरकार मोगलशाही प्रमाणे हाणून मारून जनतेची मुस्कटदाबी करत आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यात करिता आजचे रस्ता रोको आंदोलन केले आहे.” असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय काळे यांनी केले. तसेच या सर्व प्रकारच्या गलथन कारभारांबाबत शासनाने वेळीच दखल घेऊन संबंधितांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील वेळी यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस सुरज सानप यांनी दिला. यावेळी युवा सेनेचे तालुका समन्वयक नवनाथ सुतार उपतालुकाप्रमुख अक्षय पवार, दीपक हगारे, वैभव कुदळे, विभाग प्रमुख सागर कदम, सौरभ साखरे, योगेश मिसाळ, गोरख ढोले, विनायक गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना आणि इतर अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनास उपस्थित होते. प्रसंगी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देटे व पोलीस नाईक साळवे यांनी यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed