प्रतिनिधी - बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात आज राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.मीनाक्षी वाघमारे यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतामधून गणित दिनाचे महत्व अधोरेखित करत श्री रामानुजन यांचे गणित विषयात असलेले योगदान स्पष्ट केले.तसेच प्राध्यापक श्री शरद भोसले यांनी गणितातील अनेक रंजक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या व गणित विषय मनोरंजनामधून शिकल्यास अवघड वाटणारा विषय सोपा होऊन जातो हे विविध उदाहरणांमधून स्पष्ट केले.तसेच त्यांनी रामानुजन यांनी गणित विषयात लावलेले अनेक शोध स्पष्ट सांगितले.यावेळी 11 वी व 12 वी च्या विद्यार्थांनी आपली मनोगते व्यक्त केली .तसेच विद्यालयात यावेळी पुणे जिल्हा टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली.यावेळी प्राध्यापिका सौ.शुभांगी रुपनवर यांनी विद्यार्थ्यांची गणित दिनाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी विद्यालयाचे प्रा.श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री निवास सणस व इतर सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.
Post Views: 425