पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने पुणे येथील आमदार निवासस्थान विधान भवन पुणे येथे तातडीची मिटिंग पार पडली त्यामध्ये महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेश्वर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्यामध्ये मंगलदास निकाळजे यांनी केल्याल्या कामाची दखल घेऊन मंगलदास निकाळजे यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मंगलदास निकाळजे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पुणे जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख पदावर काम पाहत होते त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 ची अंमलबजावणी करण्यासाठी कित्येक कार्यालयाना भाग पडले आहे, रुग्णाचे हक्क बाबत त्यांना मिळणाऱ्या सुविधानाची माहिती ही सामान्य नागरिकांना मिळण्यासाठी रुग्ण हक्काच्या सनदी प्रत्येक हॉस्पिटलने आपल्या दर्शनी भागात लावण्यासाठी आदेश करुन घेतले व त्या लावण्यास भाग पडले आहे, माहिती अधिकार दिन, संविधान दिन, प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरे करण्याचे आदेश करुन ते साजरे करुन घेतले आहेत, बारामती तालुक्यात होत असलेल्या अवैध मुरूम व इतर प्रकारच्या गौण खनिजाच्या तक्रारी करुन त्या अंतिम टप्प्यात आणल्या आहेत काही दिवसात संबंधितवर दंडात्मक स्वरूपाची कार्यवाही होऊन शासन कित्येक कोटींचा निधी मिळणार आहे अशा अनेक प्रकारची कामे केली आहेत मंगलदास निकाळजे यांचा माहिती अधिकार कायदा व इतर कायद्यावर सखोल अभ्यास आहे कोणतेही प्रकरण हातात घेतले कि ते तडीसनेल्या शिवाय ते शांत राहत नाहीत अशी त्यांची ओळख आहे. निकाळजे यांना उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निकाळजे यांनी सांगितले कि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सदस्य वाढवून माहिती अधिकार कायदा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवून लोकांचा सहभाग शासकीय कारभारामध्ये जास्तीत जास्त करुन घेणार आहे व शासन कारभार पारदर्शतेने चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, व सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवून लोकहिताची कामे करणार आहे तसेच भ्रष्टाचार मुक्त शासन कारभार करणार असल्याची भूमिका मांडली आहे.
