प्रतिनिधी – आज दिनांक 05/12/2022 रोजी मौजे शिर्सुफळ येथे एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान व पाचट व्यवस्थापन मोहीम अंतर्गत अनिल आटोळे यांचे शेतावर पाचट कुट्टी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी मा.श्री अरविंद यमगर साहेब यांनी ऊस पाचट व्यवस्थान व एकरी 100 टन ऊस उत्पादन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक श्री घोळवे ए. बी. यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाची माहिती दिली .
कृषी सहाय्यक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक केले.यावेळी कृषी यांत्रिकरण अतर्गत ट्रॅक्टर,रोटावेटर, चाफकटर इत्यादी यंत्रांचे उपस्थीत मान्यवर यांचे हस्ते वाटप करण्यात आले. जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रमेश हिवरकर सोसायटी सदस्य तुकाराम आटोळे, बापू ठोंबरे शेतकरी मित्र आण्णासो आटोळे आणि गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed